Wednesday 24 August 2011

माहिती-तंत्रज्ञानाचा आणि संगणकाचा दिवसेंदिवस जागतिक पातळीवर होणारा वापर पाहता हल्ली डिजिटल ग्रंथालयांना महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळेच तर डिजिटल ग्रंथपालांचं महत्त्व वाढलं आहे.
अत्याधुनिक डिजिटल ग्रंथालयांचं वैशिष्टय़ म्हणजे माऊसवर क्लिक करा आणि तात्काळ माहिती मिळवा असंच आहे. इंटरनेटच्या अफाट महासागरातून वाचकाला योग्य माहिती तात्काळ पुरवण्याचं महत्त्वाचं काम डिजिटल ग्रंथपालच करू शकतो. वाचकाला हवी असलेली अचूक माहिती योग्यतेने शिकवण्याचं काम डिजिटल ग्रंथालय व्यवस्थापनात शिकवलं जातं. डिजिटल लायब्ररीयन, डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर,सॉफ्टवेअर इंजिनीअर, भाषांतरतज्ज्ञ, लायब्ररी असिस्टंट,ऑनलाइन ग्राहक यांच्या सहभागाने डिजिटल ग्रंथालय चालवता येऊ शकतं. डिजिटल ग्रंथालयात खालील गोष्टींचा समावेश होतो.

ग्रंथालय व्यवस्थापन- ग्रंथालयाचं संगणकीकरण करून नेटवर्कद्वारे ग्राहक-कर्मचाऱ्यांना त्यांच्या टेबलावर तात्काळ माहिती मिळवण्याची सोय करणं, हे डिजिटल ग्रंथपालाचं प्रमुख काम असतं. लायब्ररी व्यवस्थापनाची निरनिराळी सॉफ्टवेअर्स असतात. त्याचा उपयोग ग्रंथालय व्यवस्थापनात केला जातो. आजकाल इंटरनेट व्यवस्थापन ही गोष्ट खूपच कॉमन झाली आहे. त्यामुळे लहान-मोठय़ा संस्थांमध्ये इंटरनेट सुविधांसह छोटी-मोठी ग्रंथालयं असतातच. तिथे काही प्रमाणात लहान-मोठी पुस्तकं , मॅगझिन्स असतात. तिथे ठरावीक ग्रंथपाल नसल्यामुळे ग्रंथालयातील पुस्तकांचं विषयानुरूप वर्गीकरण करणं,कॅटलॉगिंग करणं, विषयानुसार की-वर्ड अरेंज करून डेटाबेस तयार करणं सारखी कामं करावी लागतात. ग्रंथालयाला लागणा-या नवीन पुस्तकांची खरेदी-विक्री करावी लागते. तसंच अस्तित्वात असलेल्या ग्रंथालयातील कर्मचा-यांचा आढावा घेण्यासाठी आठवडय़ातून एकदा ग्रंथालयांना भेटी द्याव्या लागतात.

ई-लायब्ररी सेवा : पारंपरिक सार्वजनिक वाचनालयांना डिजिटल लायब्ररीची जोड दिल्यास सभासदांना घरबसल्या वाचनालयातील पुस्तकं वाचण्याची सोय होते. त्यासाठी ग्रंथालयातील माहितीचं आणि पुस्तकांचं सीडीत रूपांतर करावं लागतं.

ई-बुक सेवा : ग्रंथालयातील पुस्तकं सीडीवर घ्यावी लागतात. प्रत्येक पुस्तकांची परीक्षणंही त्या पुस्तकांनुसार सीडीवर घेतली तर ती अ‍ॅडिशनल माहिती असू शकते.

भाषांतर सेवा : स्पेन, जर्मन, स्पॅनिश, जपानी, अरेबिक या भाषांतल्या भाषांतरित साहित्याची मागणी वाढत आहे. जर डिजिटल ग्रंथलयात या भाषा जाणणारे जाणकार असतील तर नक्कीच फायदा होईल. वाचकांना ऑनलाइन भाषांतरित साहित्य वाचण्याची संधी मिळेल.

वृत्तपत्रकात्रण सेवा : हल्ली वृत्तपत्रांच्या ई-आवृत्त्या निघायला लागल्या आहेत. या ई-सुविधेचा उपयोग करून वृत्तपत्र आणि मॅगझिनचे ई-संग्रहही करता येऊ शकतात.
 डिजिटल अर्काइव्हज : जुने ग्रंथ, पुरातन साहित्यसारख्या दुर्मीळ ग्रंथसंग्रहाची फोटो कॉपी करून ते संग्रहित करण्याचं काम डिजिटल आर्काईव्हजमध्ये केलं जातं.हल्ली बी.लिब, एम. लिब या ग्रंथालय व्यवस्थापनाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात डिजिटल ग्रंथालय व्यवस्थापन शिकवलं जातं. ज्यांनी दहावी नंतर ग्रंथालय व्यवस्थापनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केला आहे, त्यांनाही डिजिटल ग्रंथालय व्यवस्थापनाचा सर्टिफिकेट कोर्स करता येतो.

अभ्यासक्रम चालवणारी विद्यापीठं
मुंबई विद्यापीठ, फोर्ट.
एसएचपीटी स्कूल ऑफ लायब्ररी सायन्स, एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटी, नाथीबाई ठाकरसी रोड, मुंबई (महाराष्ट्र)
पुणे विद्यापीठ, जयकर लायब्ररी पुणे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी सायन्स अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सायन्स, पुणे.
नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गुलटेकडी, पुणे.
शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर, कोल्हापूर.
नूतन मराठा महविद्यालय, उमवीनगर, जळगाव.
जेडीएमव्हीपी समाजाचे आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, जळगाव.
नागपूर विद्यापीठ, नागपूर.
एचपीटी आर्टस आणि आरवायके सायन्स कॉलेज, नाशिक.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
अमरावती विद्यापीठ, तपोवन रोड, अमरावती.
जामिया मिल्लिया इस्लामिया, दिल्ली (संकेतस्थळ - http://www.bhu.ac.in/)
बनारस हिंदू विश्वविद्यालय, अलीगढ.
दिल्ली विश्वविद्यालय, दिल्ली.
महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी.
पंडित रवि शंकर शुक्ल विश्वविद्यालय, रायपूर, छत्तीसगढ.
सम्पूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी.
कुरुक्षेत्र विश्वविद्यालय, हरियाणा.
पंजाब विश्वविद्यालय.
गुजरात विश्वविद्यालय.
मदुरै कामराज विश्वविद्यालय, तामिळनाडू.
अन्नामलै विश्वविद्यालय, तामिळनाडू.
माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता संस्थान, भोपाल.आंध्र विश्वविद्यालय आणि अमरावती विश्वविद्यालय, महाराष्ट्र.
आर्य विद्यापीठ कन्या महाविद्यालय, भरतपूर (राजस्थान)
राजस्थान विश्वविद्यालय, भुसावर, भरतपूर, (राजस्थान)
अवधेश प्रताप सिंह विश्वविद्यालय, रीवा (मध्यप्रदेश)
बंगलौर विश्वविद्यालय, बंगलौर (कर्नाटक)
बिहानी शिक्षा महाविद्यालय, पुष्कर बाइपास, अजमेर राजस्थान (राजस्थान)
भावनगर विश्वविद्यालय, गौरीशंकर लेक रोड, भावनगर (गुजरात)
बिरला प्रौद्योगिकी संस्थान, मेसरा, रांची (झारखंड)
बिशप हेब्बर कॉलेज, पोस्ट बॉक्स नं. 615, तिरुचिरापल्ली (तामिळनाडू)
भीमराव आंबेडकर विश्वविद्यालय, आग्रा (उत्तरप्रदेश)दूरस्थ शिक्षण संस्थांची यादी

शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय, ध्यानगंगोत्री, गंगापूर डॅम के पास, नाशिक आणि मुंबई.इंदिरा गांधी राष्ट्रीय खुला विश्वविद्यालय, मैदानगढ, नवी दिल्ली.
डॉ. बी. आर. आंबेडकर खुलं विश्वविद्यालय, रोड नं. ४६, जुबली हिल्स, हैदराबाद
कोटा मुक्त विश्वविद्यालय, रावतभाटा रोड, अखेलगढ, कोटा.
नालंदा मुक्त विश्वविद्यालय, कॅम्प ऑफिस, पटना
मध्य प्रदेश भोज (मुक्त) विश्वविद्यालय, शिवाजीनगर, भोपाळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विश्वविद्यालय, मानस गंगोत्री, मैसूर.
उ.प्र. राजश्री टंडन मुक्त विश्वविद्यालय, इलाहबाद.

Friday 1 July 2011

library Services

CAS -: The purpose of a current-awareness service is to inform the users about new acquisitions in their libraries. Public libraries in particular have used display boards and shelves to draw attention to recent additions, and many libraries produce complete or selective lists for circulation to patrons.and the main objectives of the CAS give the immediate services to the library users.current awareness uses in the various sectors corporate commercial as well as industrial.

KOHA Open Source Library Management Software OPAC Customization by Softech Solutions & Services, Pune